लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया

चंद्रपूर : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेला मोठा विजय असल्याचे म्हटले आहे.
खासदार धानोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या अन्यायाविरोधात देशभर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाला तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला यश मिळाले असून, त्यानंतर केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारावा लागला.
त्यांनी पुढे म्हटले की, हा राजीनामा केवळ एका मंत्र्यांच्या पदत्यागापुरता मर्यादित नसून, देशातील लाखो विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी न्यायासाठी दिलेल्या लढ्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेसचा लढा यापुढेही सुरू राहील, असे सांगताना युवकांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही सत्तेला माफ केले जाणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
शेवटी त्यांनी "लढा विद्यार्थ्यांचा... विजय सत्याचा!" असा संदेश देत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला.

Comments