लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

माजरीत सट्टापट्टी जुगारावर पोलिसांची धाड; एक आरोपी ताब्यात, रोख रक्कम जप्त.

आंबेडकर वॉर्डात सट्टापट्टी जुगारावर माजरी पोलिसांची धाड; एक आरोपी ताब्यात, ₹८५० चा मुद्देमाल जप्त

माजरी | दि. 26 जुलै २०२६

माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर वॉर्ड, आंबेडकर भवन परिसरात सुरू असलेल्या सट्टापट्टी व मटका जुगारावर माजरी पोलिसांनी २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी धाड टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपीकडून रोख ₹८५०, सट्टापट्टीचे आकडे लिहिलेली कागदी चिठ्ठी आणि एक पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक हरिदास चोपने व पोलीस कर्मचारी ज्ञानेश कोटरंगे हे गस्त घालत असताना मुखबिरामार्फत आंबेडकर भवन परिसरात एका व्यक्तीकडून सट्टापट्टी व मटका जुगार चालविला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान सट्टापट्टीचे आकडे लावणारे काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र सट्टापट्टी स्वीकारणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला.

चौकशीत आरोपीने आपले नाव ज्ञानेद्र उर्फ दादू विजयकुमार राही (वय ३८), रा. आंबेडकर वॉर्ड, माजरी कॉलरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर असे सांगितले. पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडून रोख ₹८५०, सट्टापट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी व एक पेन जप्त करण्यात आले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 


Comments