लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कारगिल विजय दिनानिमित्त वरोऱ्यात वीर शहीदांना अभिवादन; शहीद योगेश डाहुले स्मारकावर पुष्पचक्र अर्पण

कारगिल विजय दिनानिमित्त वरोऱ्यात वीर शहीदांना अभिवादन; शहीद योगेश डाहुले स्मारकावर पुष्पचक्र अर्पण

वरोरा, दि. २६ जुलै : कारगिल विजय दिनानिमित्त वरोरा येथील शहीद योगेश डाहुले स्मारक येथे आयोजित "वीर शहीद अभिवादन कार्यक्रम" देशभक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी कारगिल युद्धातील भारतीय जवानांनी दाखविलेल्या अदम्य शौर्य, पराक्रम, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. कारगिलच्या रणभूमीवर प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे (वरोरा), नगराध्यक्ष प्रफुलजी चटकी (भद्रावती), अमनभाऊ टेमुर्डे, सुरेशजी बोबाटे, प्रकाशजी चिकटे, वसंतरावजी डाहुले, अशोकजी वर्मा, गुलाबरावजी जीवतोडे यांच्यासह माजी सैनिक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन जय जवान जय किसान बहुउद्देशीय माजी सैनिक संस्था, वरोरा, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना (महाराष्ट्र राज्य शाखा, जि. चंद्रपूर), माजी सैनिक संघ, वरोरा, एअर बार्न ट्रेनिंग सेंटर, वरोरा, स्व. मोरेश्वर टेमुर्डे चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा, बेस्ट सिक्युरिटी एजन्सी, वरोरा आणि पैगाम साहित्य मंच, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी "शहीदांचे बलिदान चिरंतन स्मरणात राहील" असा निर्धार व्यक्त करत **"जय हिंद"**च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 


Comments