लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

लोकनेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.सामान्य ज्ञान परीक्षेच्या विजेत्यांचा सत्कार व बक्षीस वितरण


लोकनेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी.

सामान्य ज्ञान परीक्षेच्या विजेत्यांचा सत्कार व बक्षीस वितरण

दिनांक : ४ जुलै २०२६

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, लोकनेते दिवंगत बाळूभाऊ नारायण धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आज (४ जुलै २०२६) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. रक्तदान शिबिर, सामान्य ज्ञान परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण, तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या कार्याचा गौरव करताना, सर्वसामान्य जनतेशी असलेले त्यांचे अतूट नाते, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संसदेत बुलंद आवाज उठविल्याची आठवण करून दिली.
शांत, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व असतानाच अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे बाळूभाऊ धानोरकर हे जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे लोकनेते म्हणून ओळखले जात होते. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध, सर्वसमावेशक राजकारण आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांनी अल्पावधीतच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.

सिंचन, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत.

जयंतीनिमित्त आयोजित चंद्रपूर येथे रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि बौद्धिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थितांनी स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या अपूर्ण विकासस्वप्नांची पूर्तता करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी असून, जनतेच्या मनातील त्यांचे स्थान सदैव अढळ राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमासाठी खासदार प्रतिभाताई धानोरकर , मुलगा पार्थ धानोरकर, प्रविण काकडे, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे,माजी नगराध्यक्ष ऐहेतेशाम अली, आशिष भाऊ ठाकरे, यूवा नेते शुभम चिमुरकर , बंडू भाऊ देऊळकर नगरसेवक , माजी सभापती राजू चिकटे, हरीश जाधव , राष्ट्रवादीचे नेते विलास नेरकर, माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेते विलास टिपले, इस्तेका भाई पठाण, काँग्रेस नेते ऊत्तमजी गेडाम,किशोर हेमके, नगरसेवक अनिल झोटिंग यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी, नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन डॉ. प्रशात खुळे यांनी केले.

Comments