लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आषाढी एकादशीनिमित्त वरोऱ्यात भक्तीचा महासागर; विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.

आषाढी एकादशीनिमित्त वरोऱ्यात भक्तीचा महासागर; विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी.


वरोरा | शनिवार, दि. २५ जुलै २०२६ :
आषाढी एकादशीनिमित्त वरोरा शहरातील विठ्ठल मंदिर परिसर शनिवारी भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. पहाटेपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिरात काकड आरती, अभिषेक, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि नामस्मरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
"विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल" या अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला.
यावेळी मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी परंपरेचा वारसा जपत अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वरोरा शहरात सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Comments