लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

येंसा येथे ३ हजारांचा देशी दारूसाठा जप्त; ६१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

येंसा येथे ३ हजारांचा देशी दारूसाठा जप्त; ६१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा | दि. ११ जुलै २०२६

वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा येंसा येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३ हजार रुपयांचा देशी दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी तुळसाबाई किसन गोडके (वय ६१, रा. येंसा, ता. वरोरा) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५(ई) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस हवालदार प्रशांत मधुकर नागोसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १० जुलै रोजी दुपारी येंसा गावात छापा टाकण्यात आला. 
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान आरोपीच्या घरातील एका प्लास्टिकच्या पिशवीत ९० मिलीचे ७५ देशी दारूचे पाउच आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दारू विक्रीसाठी आवश्यक परवाना मागितला असता आरोपीकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुद्देमाल जप्त करून पंचनामा करण्यात आला व आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. 

ही देशी दारू कोणत्या दुकानातून विकत घेतली आहे. की डुप्लिकेट दारू आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.


Comments