लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भरधाव दुचाकीच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; महिला गंभीर जखमी!​वरोरा शहरातील घाटे चौकातील घटना: निष्काळजी चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल.

भरधाव दुचाकीच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; महिला गंभीर जखमी!

वरोरा शहरातील घाटे चौकातील घटना: निष्काळजी चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल.

वरोरा- प्रतिनिधी

वरोरा शहरातील घाटे चौक परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एका विवाहित महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी भरधाव व निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या चालकाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पद्मालय नगर, वरोरा येथील वेल्डिंग व्यावसायिक अरविंद मशाखेत्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाचा प्रायुष चंद्रकांत मुडे (वय 21, रा. चामोर्शी) हा मामाच्या लग्नासाठी 30 जूनपासून त्यांच्या घरी राहत होता.

15 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रायुष मुडे आणि अरविंद मशाखेत्री यांची पत्नी प्रिया मशाखेत्री हे त्यांच्या मालकीच्या ज्युपिटर (एमएच 34 सीजी 8912) दुचाकीवरून सिद्धकला लॉन येथे डान्स प्रॅक्टिससाठी गेलेल्या मुलीला आणण्यासाठी जात होते. घाटे चौकातील झेब्रा क्रॉसिंगजवळ रस्ता ओलांडण्यासाठी ते थांबले असताना आनंदवन चौकाकडून नंदोरीच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एमएच 34 बीएल 2136 क्रमांकाच्या मोटारसायकलने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रायुष मुडे व प्रिया मशाखेत्री गंभीर जखमी झाले. दोघांना प्रथम वरोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी प्रायुष मुडे यांना मृत घोषित केले. प्रिया मशाखेत्री यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पत्नी उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीने सांगितले. त्यानंतर वरोरा पोलीस ठाण्यात भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी संबंधित मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments