वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेतकरी आत्महत्या प्रकरणात भद्रावतीचे तहसीलदार, नायब तहसीलदारावर गुन्हा; अॅट्रॉसिटी कायद्यान्वयेही कारवाईमृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप; फेरफार प्रकरणातील वाद, जातिवाचक शिवीगाळ व मानसिक छळाची तक्रार

शेतकरी आत्महत्या प्रकरणात भद्रावतीचे तहसीलदार, नायब तहसीलदारावर गुन्हा; अॅट्रॉसिटी कायद्यान्वयेही कारवाई

मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप; फेरफार प्रकरणातील वाद, जातिवाचक शिवीगाळ व मानसिक छळाची तक्रार
भद्रावती | प्रतिनिधी
8july 2026
मोरवा येथील शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या आत्महत्येप्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेश्राम यांच्या पत्नी वंदना परमेश्वर मेश्राम यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी कारवाई केली असून, या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, मौजा कुरोडा येथील सर्व्हे क्रमांक ८६ व ८७ मधील शेतीच्या फेरफार प्रकरणात कोणताही स्थगिती आदेश नसतानाही तत्कालीन तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी जाणीवपूर्वक फेरफार नोंद केली नाही.
तसेच, २६ सप्टेंबर २०२५ रोजी परमेश्वर मेश्राम हे फेरफाराबाबत विचारणा करण्यासाठी तहसील कार्यालयात गेले असता, दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अपमानास्पद वागणुकीमुळे मानसिक धक्का बसल्याने त्यांनी तहसील कार्यालयातच विषारी औषध प्राशन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचारादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी अपराध क्रमांक ६६९/२०२६ नोंद करून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती भद्रावतीचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी दिली.
पुनर्नियुक्तीनंतर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
या प्रकरणातील तहसीलदार राजेश भांडारकर यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने निलंबन आदेश रद्द केल्यामुळे त्यांची पुन्हा भद्रावती येथे नियुक्ती करण्यात आली. मात्र, पुनर्नियुक्तीनंतर काहीच दिवसांत त्यांच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून महसूल विभागासह जिल्हाभरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments