लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भरधाव अज्ञात वाहनाची धडक; अनोळखी इसमाचा जागीच मृत्यूचिनोरा येथे मध्यरात्रीची घटना; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव अज्ञात वाहनाची धडक; अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू
चिनोरा येथे मध्यरात्रीची घटना; अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वरोरा | दि. १० जुलै २०२६
चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिनोरा येथील व्यंकटेश हॉटेलसमोर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीएमआर कंपनीमध्ये कार्यरत असलेले प्रतीक महादेव बोदे हे रात्री गस्तीवर असताना पहाटे सुमारे १.२९ वाजताच्या सुमारास व्यंकटेश हॉटेलसमोर रस्त्यावर एक अनोळखी इसम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या डोक्याला, गालाला व पायाला गंभीर दुखापत झालेली आढळून आली. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम १०६ व २८१ अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दिशांत ऋषी काळे करीत आहेत.

......

Comments