लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चहा टपरी हॉटेल मधून २५ हजारांची रोकड लंपास; वरोरा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल.

चहा टपरी हॉटेल मधून २५ हजारांची रोकड लंपास; वरोरा पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल

वरोरा : शहरातील जाजू चौक परिसरातील एका चहाच्या टपरीतून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305(अ) व 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश दत्तात्रय देवळे (रा. मोकासे ले-आऊट, वरोरा) हे जाजू चौकात चहाची टपरी चालवतात. १९ जुलै रोजी रात्री हॉटेल बंद करण्याची जबाबदारी त्यांनी पुतण्या पवन देवळे याच्याकडे सोपवून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यानंतर मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानातील लोखंडी पेटीत ठेवलेली बँकेच्या आरडी खात्यातून काढलेली २५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे आढळले.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.

Comments