वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आमदार करण देवतळे यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा; ८४ किलो लाडू तुला, रक्तदान शिबिर व दिव्यांगांना सायकल वाटप.

आमदार करण देवतळे यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी उत्साहात साजरा; ८४ किलो लाडू तुला, रक्तदान शिबिर व दिव्यांगांना सायकल वाटप.

वरोरा | दि. ८ जुलै २०२६


वरोऱ्याचे लोकप्रिय युवा आमदार मा. श्री. करण देवतळे यांचा वाढदिवस बुधवारी (दि. ८ जुलै) शहरात विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आमदार करणदादा देवतळे मित्र परिवारातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमदार देवतळे यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छांसह त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ८४ किलो वजनाच्या भव्य ‘लाडू तुले’चे आयोजन करण्यात आले. 
या आगळ्यावेगळ्या उपक्रमानंतर उपस्थित नागरिक, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाडूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भारतीय जनता पक्षाचे आमदार करण देवतळे यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयात (एलआयसी कार्यालयाजवळ, मोहबाळा रोड, वरोरा) सकाळी ११ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी नागपूर येथील डॉ. हेडगेवार ब्लड सेंटरचे विशेष सहकार्य लाभले. समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ३६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.
याचबरोबर वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी सायकल वाटप कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. गरजू दिव्यांगांना सायकलींचे वितरण करून त्यांच्या दैनंदिन जीवनात मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सेवाभावी उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.

या सर्व कार्यक्रमांना आमदार करण देवतळे यांच्या पत्नींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘आमदार करणदादा देवतळे मित्र परिवार’तर्फे करण्यात आले होते. यामध्ये सतीश निर्बान, ऋषभ निर्बान, लव निर्बान, अजिंक्य नरडे, सौरभ गोल्हार, खुश निर्बान, ओम वरभे, हर्षद बोडणे, आनंद मोरे, सुधीर डोंगे, सुरज लोणकर, अनिकेत मित्तलवार, निपुण मेहता, बाला चांभारे, प्रफुल नरडे यांच्यासह मित्र परिवारातील अनेक सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.

Comments