लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भरधाव स्कॉर्पिओची बैलगाडीला धडक; मजूर गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा.

भरधाव स्कॉर्पिओची बैलगाडीला धडक; मजूर गंभीर जखमी, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा.
भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील बराज तांडा परिसरात भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने बैलगाडीवरील मजूर गंभीर जखमी झाला असून दोन्ही बैलही जखमी झाले आहेत. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास संजय तालाजी परचाके हे सहकारी मजूर लवकुश सूर्यभान कोमताळे यांच्यासह बैलगाडीने शेताकडे जात असताना बराज तांडा गावाजवळ मागून भरधाव आलेल्या पांढऱ्या स्कॉर्पिओने बैलगाडीला धडक दिली. या अपघातात बैलगाडी पलटून संजय परचाके यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली, तर बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
जखमी संजय परचाके यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात मोटार वाहन अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कपिल अशोक भोयर करीत आहेत. 

Comments