लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रोटरी क्लब ऑफ वरोराचा भव्य पदग्रहण सोहळा संपन्न; सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याचा नवा संकल्प


रोटरी क्लब ऑफ वरोराचा भव्य पदग्रहण सोहळा संपन्न; सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याचा नवा संकल्प

वरोरा : चेतन लूतडे 

रोटरी क्लब ऑफ वरोराचा वर्ष २०२६-२७ चा भव्य पदग्रहण सोहळा शनिवारी (दि. १८ जुलै) कटारिया मंगल कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात रोटरी, इनर व्हील आणि रोटरेक्ट क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारत आगामी वर्षासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला.

रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारिणीत रोटेरियन अभिजीत मणियार यांनी अध्यक्ष, रोटेरियन अभिजीत बोथले यांनी सचिव तर रोटेरियन सुनील अयाचित यांनी कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष रोटेरियन योगेश डोंगरावर व मावळते सचिव रोटेरियन राहुल पावाडे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली.

याच कार्यक्रमात इनर व्हील क्लबच्या अध्यक्षपदी श्रीमती स्नेहल पी. पट्टीवार व सचिवपदी श्रीमती प्राजक्ता एम. कोहले यांनी, तर रोटरेक्ट क्लबच्या अध्यक्षपदी रोटरॅक्टर विकी एस. आगलवे आणि सचिवपदी रोटरॅक्टर श्रेयांश फलोदिया यांनी पदभार स्वीकारला.

या सोहळ्यास नगर परिषद अध्यक्षा अर्चनाताई ठाकरे, मुकेशजी जीवतोडे आणि विद्या अविनाश रघुशे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटेरियन श्रीनिवास लेले यांनी भूषविले, तर रोटेरियन राजेश गढिकर यांनी अतिथी वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.

नवनियुक्त सचिव रोटेरियन अभिजीत बोथले यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष रोटेरियन अभिजीत मणियार यांनी आगामी वर्षात स्थानिक समाजाच्या हितासाठी विविध सेवा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यावर क्लबचा विशेष भर राहील, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजन आणि स्नेहसभेने उत्साहपूर्ण वातावरणात झाली.



Comments