वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू व नणंदेविरोधात भद्रावती पोलिसांत तक्रार.

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पती, सासू व नणंदेविरोधात भद्रावती पोलिसांत तक्रार

भद्रावती, दि. २२ जुलै : हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करत एका २० वर्षीय विवाहितेने पती, सासू आणि नणंदेविरोधात भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा विवाह ३० मे २०२५ रोजी हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे झाला. विवाहानंतर ती पतीसोबत घुग्घुस येथे राहत होती. सुरुवातीपासूनच पती, सासू आणि नणंद यांनी "लग्नात माहेरकडून काहीच दिले नाही" असे म्हणत टोमणे मारण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे आणण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती. या मागणीस विरोध केल्यावर शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.
महिलेने सांगितले की, पती घराकडे दुर्लक्ष करत असून तिच्या तक्रारींकडेही लक्ष देत नव्हता. उलट तिच्यावरच माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ती १३ फेब्रुवारी २०२६ रोजी माहेरी निघून गेली.
त्यानंतर पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तसेच भरोसा सेल, चंद्रपूर येथे समुपदेशनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पती एकदाच हजर राहिला असून त्यानंतर कोणत्याही तारखेला उपस्थित राहिला नाही, तसेच पत्नीला नांदविण्यासही तयार नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सध्या तक्रारदार महिला मागील सहा महिन्यांपासून माहेरी राहत असून, पती व सासरच्या मंडळींपासून जीवितास धोका असल्याची भीती तिने व्यक्त केली आहे. संबंधित तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत तिने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


Comments