वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

*'बाळूभाऊ धानोरकर स्मृती' हाफ मॅरेथॉन: मुंबईचा सचिन यादव आणि चंद्रपूरची साक्षी पोलीजवार ठरले 'महा-विजेते'*

*'बाळूभाऊ धानोरकर स्मृती' हाफ मॅरेथॉन: मुंबईचा सचिन यादव आणि चंद्रपूरची साक्षी पोलीजवार ठरले 'महा-विजेते'*

चंद्रपूर : मराठा चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूरच्या वतीने आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक ऐतिहासिक क्रीडा सोहळा चंद्रपूरच्या भूमीत संपन्न झाला. दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी 'रन फॉर इन्स्पिरेशन, रन फॉर बाळूभाऊ' या संकल्पनेवर आधारित भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार भद्रावती ते पडोली चौक, चंद्रपूर या मार्गावर पार पडलेल्या या ऐतिहासिक धावण्याच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी अभूतपूर्व गर्दी करत मोठा उत्साह दाखवला; तर विशेष आकर्षण म्हणून छोटूलाल सोमलकर यांनी आपल्या वाहनावर तिरंगा लावून या संपूर्ण मॅरेथॉन रॅलीचे अत्यंत दिमाखात नेतृत्व केले.

या चुरशीच्या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या धावपटूंनी आपला कस लावला, ज्यामध्ये खुल्या गटात मुंबईच्या सचिन यादव याने अव्वल स्थान पटकावत १,००,००० रुपयांचे प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक आणि मानाचा किताब आपल्या नावे केला. याच गटात नागपूरच्या राजन यादव याने द्वितीय क्रमांक मिळवून ५१,००० रुपये आणि नागराज खुडसंगे याने तृतीय क्रमांक पटकावून ३१,००० रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. महिला स्पर्धकांसाठी ठेवण्यात आलेल्या विशेष बक्षिसांमध्ये चंद्रपूरची साक्षी पोलीजवार हिने प्रथम (१५,००० रुपये), अभिलाषा भगत हिने द्वितीय (१०,००० रुपये) आणि श्रद्धा थोरात हिने तृतीय (५,००० रुपये) क्रमांक पटकावला, तसेच अचल रमेश कंदुकर हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्थानिक खेळाडूंना वाव देण्यासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील स्पर्धकांसाठी जाहीर केलेल्या विशेष पुरस्कारांमध्ये विवेक भगत याने प्रथम (२१,००० रुपये), रितिक ढोडरे याने द्वितीय (११,००० रुपये) आणि यश सातपुते याने तृतीय (७,००० रुपये) क्रमांक मिळवून दिमाखदार कामगिरी केली.

या भव्य क्रीडा महोत्सवाप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती ग्रामीण काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, चंद्रपूर ग्रामीण तालुका अध्यक्ष नरुले, प्रवीण काकडे, नगरसेवक राहुल चौधरी, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पानपट्टीवार, धनुभाऊ गुंडावार, नगरसेविका सरिता सूर, नगरसेवक सुनील नामोजवार, नगरसेविका रेखा खुटेमाटे, नगरसेविका  शोभा पारखी,  नगरसेविका उर्मिला साव, नगरसेविका आशाताई जाधव, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेवक प्रथमेश गेडाम, कल्पना मत्ते, अर्चना सातपुते, रितेश वाढाई, छोटू धकाते, नितीन सातपुते, मोरेश्वर आवारी, गोपाल अमृतकर, सुयोग भोयर, अतुल वाघमारे, मनीष दास आणि दीक्षा सातपुते, राहुल तायडे यांसह राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक करत दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. हा उपक्रम जिल्ह्यातील व राज्यातील युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि आरोग्याविषयी जागरूक राहण्यासाठी मोठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केला. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीला एक नवा आयाम देणाऱ्या या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंच्या राहण्याची व सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. मराठा चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांनी या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी अथक परिश्रम घेतले व त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या मॅरेथॉनने चंद्रपूरच्या क्रीडा जगतात एक नवा सुवर्ण इतिहास रचला आहे. सूत्रसंचालन मोंटू सिंग, कोविल मडावी यांनी केले.

Comments