लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, ४४ क्वार्टर जप्त

वरोरा तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचा धडक कारवाई; दोन ठिकाणी छापे, ४४ क्वार्टर जप्त

मोहोबळा–जीएमआर कंपनी मार्गावरील शेत आणि येंसा गावात कारवाई; दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल.

वरोरा | प्रतिनिधी :8/7/2026
वरोरा पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीविरोधात धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ४४ देशी दारूच्या क्वार्टर जप्त केल्या. या कारवाईत सुमारे १,७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
0792 Publish FIR.pdf
पहिल्या कारवाईत पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोहोबळा रोड ते जीएमआर कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावरील शेतातील बांध्यावर छापा टाकला. तेथून दिवाकर रामलू आकुलवार (वय ४९, रा. मालवीय वॉर्ड, वरोरा) याच्या ताब्यातील १५ देशी दारूच्या क्वार्टर जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत सुमारे ६०० रुपये असून त्याच्याविरुद्ध एफआयआर क्र. ०७९१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत वरोरा पोलिसांनी मौजा येंसा येथे छापा टाकून विठ्ठल किसन ढोके (वय ३२, रा. येंसा, ता. वरोरा) याच्या घरातून ९० एमएल क्षमतेच्या २९ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या मुद्देमालाची किंमत १,१६० रुपये असून आरोपीकडे दारू साठवणूक व विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध एफआयआर क्र. ०७९२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
0792 Publish FIR.pdf (1).html
दोन्ही कारवाया गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या नियमित पेट्रोलिंगदरम्यान करण्यात आल्या. पंचांसमक्ष दारूचा साठा जप्त करून नमुने सीलबंद करण्यात आले असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

......

Comments