लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र महावितरण उपविभाग स्थापन करण्याची मागणी विधानसभेत; आमदार करण देवतळे यांचा जनहिताचा मुद्दा.

वरोरा शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र महावितरण उपविभाग स्थापन करण्याची मागणी विधानसभेत; आमदार करण देवतळे यांचा जनहिताचा मुद्दा.

वरोरा : चेतन लूतडे -1/7/2026
राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान वरोरा शहर व ग्रामीण भागासाठी स्वतंत्र महावितरण उपविभाग स्थापन करण्याची जनहिताची मागणी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी विधानसभेत ठामपणे मांडली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, वरोरा शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत लोकसंख्या, घरगुती वीज ग्राहक, कृषी पंपधारक तसेच औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिसरातील औद्योगिक विकास, कोळसा खाणींचा विस्तार आणि वाढत्या वीज वापरामुळे विद्यमान महावितरण उपविभागावर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला आहे.
या वाढत्या ताणामुळे वारंवार तांत्रिक बिघाड, लोडशेडिंग, वीजपुरवठ्यातील खंड, तक्रारींचे निवारण होण्यास होणारा विलंब तसेच दुरुस्तीच्या कामात अडचणी निर्माण होत असल्याने नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आमदार देवतळे यांनी वरोरा शहरासाठी स्वतंत्र महावितरण उपविभाग आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र उपविभाग स्थापन करण्याची मागणी केली. या निर्णयामुळे शहरी व ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल, तांत्रिक बिघाडांवर तातडीने नियंत्रण मिळवता येईल, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण होईल आणि वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
यासोबतच भविष्यातील वाढत्या वीज मागणीचा विचार करून आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून स्वतंत्र उपविभागांना सक्षम करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
वरोरा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी हा प्रस्ताव तातडीने मंजूर करून स्वतंत्र महावितरण उपविभाग स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी आमदार करण देवतळे यांनी विधानसभेत केली. हा प्रश्न मार्गी लागल्यास वरोरा तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार, जलद व विश्वासार्ह वीज सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments