लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अवजारे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ गुन्हे उघडकीसएक आरोपी अटकेत; सुमारे ₹९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त, चोरीत वापरलेले पिकअप वाहनही जप्त

 अवजारे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५ गुन्हे उघडकीस

एक आरोपी अटकेत; सुमारे ₹९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त, चोरीत वापरलेले पिकअप वाहनही जप्त

चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूरने शेती अवजारे व साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, गडचांदूर व राजुरा पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण पाच चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला.
अटक करण्यात आलेला आरोपी शिवराज चिकन बेलपुडी (वय ३१, रा. राजीव गांधी नगर, आझाद चौक, चंद्रपूर) असून त्याच्यावर यापूर्वीही घरफोडी व चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत.
गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतातून लोखंडी गेट, बैलबंडीची चाके, स्प्रिंकलर, मोटार पंप, फवारणी पंप, अॅल्युमिनियम वायर आदी शेती साहित्य चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीसांनी आरोपीकडून विविध गुन्ह्यांतील सुमारे ₹२.५१ लाख किमतीचे शेती साहित्य तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH34 CQ 1310) किंमत सुमारे ₹७ लाख असा एकूण ₹९.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पोलीस विभागाला लगेच यश आल्याने शेतकऱ्याने पोलिसांचे धन्यवाद मानले असून शेतकऱ्यांचे साहित्य शेतकऱ्यांना  लवकरात लवकर वापस मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.            वृक्षारोपण  करण्यात आले.

 

Comments