लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅव्हल्स वाहन बेवारस उभे; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅव्हल्स वाहन बेवारस उभे; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा | प्रतिनिधी
वरोरा शहरातील रत्नमाला चौक परिसरात रस्त्याच्या मध्यभागी कोणतेही इशारा चिन्ह किंवा रिफ्लेक्टर न लावता ट्रॅव्हल्स वाहन उभे करून ते बेवारस सोडल्याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन वरोरा येथील सफौ विजय चिकनकर (ब.नं. 1806) हे 10 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता रत्नमाला चौक येथे फिक्स पॉइंट ड्युटीवर कार्यरत होते. यावेळी एमएच-34-सीक्यू-8008 क्रमांकाचे प्रवासी ट्रॅव्हल्स वाहन रस्त्याच्या मध्यभागी कोणतेही इंडिकेटर, रिफ्लेक्टर किंवा इतर इशारा देणारे चिन्ह न लावता उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारामुळे गंभीर अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वाहन रस्त्याच्या बाजूला केले. त्यानंतर वाहन चालकाचा शोध घेतला असता काही वेळाने राजेश तुळशीदास वरघने (वय 40, व्यवसाय – चालक, रा. चंद्रपूर, मुल रोड) हा वाहनाजवळ आला. त्याच्याकडे वाहन अशा प्रकारे उभे करून सोडून जाण्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.
या निष्काळजी कृत्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने राजेश तुळशीदास वरघने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 285 अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Comments