लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

यात्रा वार्ड परिसरात मिलन राजधानी सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; एकावर गुन्हा.

यात्रा वार्ड परिसरात मिलन राजधानी सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; एकावर गुन्हा.

वरोरा : वरोरा पोलिसांनी शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या मिलन राजधानी सट्टापट्टीच्या जुगारावर धाड टाकून एका आरोपीविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणी रवी एकरे यांच्या विरुद्ध  महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून 2026 रोजी पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे हे पोलीस कर्मचारी मनोज ठाकरे यांच्यासह जुगारविरोधी पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत माहिती मिळाली की, यात्रा वॉर्ड येथील बाजारातील शिव मंदिरासमोर  नागरिकांकडून पैसे स्वीकारून मिलन राजधानी सट्टापट्टीचा हारजितचा जुगार चालवत आहे अशी माहिती मिळाली होती.

माहितीची खातरजमा करून पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी आरोपी प्रत्यक्ष सट्टापट्टीचा जुगार खेळविताना आढळून आला. झडतीदरम्यान त्याच्याकडून सट्ट्याचे आकडे लिहिलेली चिठ्ठी, एक निळ्या रंगाचे बॉलपेन आणि 1,470 रुपये रोख, असा एकूण 1,475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळी पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

................

Comments