लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कोल इंडियाचा जागतिक विक्रम; एका दिवसात १४ लाख वृक्षलागवड, वेकोली माजरी क्षेत्राने २५ हजार रोपे लावून दिले मोठे योगदान.

कोल इंडियाचा जागतिक विक्रम; एका दिवसात १४ लाख वृक्षलागवड, वेकोली माजरी क्षेत्राने २५ हजार रोपे लावून दिले मोठे योगदान.

वरोरा | प्रतिनिधी
'एक पेड माँ के नाम' या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेला बळ देत कोल इंडिया लिमिटेडने मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी एका दिवसात तब्बल १४ लाख वृक्षांची लागवड करून जागतिक विक्रमाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले. 
देशभरातील कोल इंडियाच्या विविध अनुषंगिक कंपन्यांनी या महाअभियानात सहभाग घेतला.
या अभियानांतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) यांना २ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी माजरी क्षेत्राला २५ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. क्षेत्रीय महाव्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली वेकोली माजरी क्षेत्राच्या पर्यावरण विभागाने महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या वन विभागाच्या संयुक्त सहकार्याने हे उद्दिष्ट एका दिवसात पूर्ण केले.

माजरी क्षेत्रातील विविध खुल्या व भूमिगत कोळसा खाणींच्या परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली. या उपक्रमात परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वेकोलीचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्येकाने स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.

या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, हरित क्षेत्रात वाढ, हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करणे तसेच भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे. कोळसा उत्पादनासोबत पर्यावरण संरक्षणालाही तितकेच महत्त्व देण्याची वेकोलीची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित झाली.
कोल इंडिया लिमिटेडच्या या विक्रमी वृक्षारोपण मोहिमेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची प्रक्रिया सुरू असून, हा उपक्रम देशातील सर्वात मोठ्या सामूहिक वृक्षलागवड अभियानांपैकी एक मानला जात आहे. पर्यावरण संरक्षणासाठी उद्योग, शासन आणि नागरिक यांच्या संयुक्त सहभागाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Comments