वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा बसस्थानकाजवळ गांजाचे सेवन करताना युवक पोलिसांच्या ताब्यात

वरोरा बसस्थानकाजवळ गांजाचे सेवन करताना युवक पोलिसांच्या ताब्यात

वरोरा, दि. 21 जुलै : वरोरा शहरातील बसस्थानकाजवळील पुलाखाली गांजाचे सेवन करत असलेल्या एका 23 वर्षीय युवकाविरुद्ध वरोरा पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 20 जुलै रोजी सायंकाळी बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष कारवाई करत असताना मृणाल दिलीप पडवे (वय 23, रा. सुभाष वॉर्ड, गणेशनगर, वरोरा) हा चिलममधून गांजाचे सेवन करताना आढळून आला.
पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून गांजा सेवनासाठी वापरण्यात आलेली चिनीमातीची चिलम, जळालेल्या अवशेषांसह कपडा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुनेही घेण्यात आले.
या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 च्या कलम 27 अंतर्गत गुन्हा क्रमांक 0821/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे करीत आहेत.

Comments