लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात सट्टा-पट्टी जुगारावर पोलिसांची कारवाई; एक जण ताब्यात

वरोऱ्यात सट्टा-पट्टी जुगारावर पोलिसांची कारवाई; एक जण ताब्यात

वरोरा, दि. ३० जून : वरोरा शहरातील मातोश्री वार्ड परिसरात सुरू असलेल्या सट्टा-पट्टी जुगारावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी सायंकाळी रेल्वे स्टेशनजवळील मातोश्री वार्ड परिसरात एक इसम कागदावर आकडे लिहून लोकांकडून पैसे स्वीकारत सट्टा-पट्टी जुगार चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान एका व्यक्तीस याला जुगार चालविताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी, एक बॉलपेन आणि १,६८० रुपये रोख असा एकूण १,६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम १२(अ) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वरोरा पोलीस स्टेशनच्या जवळच पाचशे मीटर अंतरावर मालवीय वार्डामध्ये बऱ्याच वर्षापासून सट्टापट्टी व अवैध दारू व सुगंधित तंबाखू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफवला असून पोलिसांनी या अवैध धंद्याचा बिमोड करण्यासाठी कंबर कसली आहे. या अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या मुख्य मालकावर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकातर्फे करण्यात येत आहे.

.........................




Comments