लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*मुसळधार पावसाने वरोरा जलमय; सखल भागात पूरस्थिती, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत*

*मुसळधार पावसाने वरोरा जलमय; सखल भागात पूरस्थिती, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत*

वरोरा, दि. ३० जुलै : वरोरा शहरात गुरुवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने शहरवासियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
     वरोरा शहरात मुसळधार पाणी बरसत असल्याने टिळक वार्ड , कर्मवीर वार्ड, माढळी चौक आदी परिसरांमध्ये नाले तुडुंब भरुन रस्त्यांवर पाणी साचले आहे.  संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले. लोकांच्या घरात पाणी शिरले. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम होऊन नागरिकांची ये-जा देखील विस्कळीत झाली.
न.प.च्या नियोजन शुन्य कारभारामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने पाणी उपसा व निचऱ्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच सखल भाग, नाले व पूरग्रस्त परिसरांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments