लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा बसस्थानक पार्किंगमधून डिओ दुचाकी चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल.

वरोरा बसस्थानक पार्किंगमधून डिओ दुचाकी चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा : शहरातील बसस्थानक परिसरातून पार्किंगमध्ये उभी असलेली डिओ कंपनीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान बशीर शेख (वय 26, रा. इंद्रप्रस्थ नगर, वरोरा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या भावाच्या नावावर असलेली भगव्या रंगाची होंडा डिओ दुचाकी (क्र. MH-34-BK-7261) ही ते घरगुती कामासाठी वापरत होते.
दि. 12 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजता अयान शेख हे खासगी कामानिमित्त वरोरा बसस्थानकात गेले होते. त्यांनी आपली दुचाकी बसस्थानकाच्या पार्किंगमध्ये उभी करून कामासाठी आत गेले. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांनी दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी पाहिली असता ती तेथून गायब असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments