लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, रोख रक्कमसह साहित्य जप्त

वरोऱ्यात सट्टापट्टीवर पोलिसांची धाड; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, रोख रक्कमसह साहित्य जप्त.
वरोरा :
वरोरा शहरातील साई मंगल कार्यालय चौक परिसरात सुरू असलेल्या सट्टापट्टीच्या अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून एका युवकाविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी सायंकाळी गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साई मंगल कार्यालय चौकातील  देशी दारू दुकानासमोरील पानटपरीवर छापा टाकण्यात आला. तेथे आयुष गौतम बागेसर (वय १९, रा. कोलरी वॉर्ड, वरोरा) हा 'श्रीदेवी नाईट' नावाच्या सट्टापट्टीवर खायवाडी करताना आढळून आला. 

कारवाईदरम्यान आरोपीकडून ₹७२० रोख रक्कम, एक डॉट पेन आणि सट्टापट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी असा एकूण ₹७२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार करीत.



Comments