वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीतील चुकीच्या मॅपिंगचा प्रश्न मंत्रालयात पोहोचला.आमदार करण देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निवेदन.

शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीतील चुकीच्या मॅपिंगचा प्रश्न मंत्रालयात पोहोचला.

आमदार करण देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले निवेदन.

  वरोरा : वरोरा तालुक्यातील मौजा टाकळी (वि.), साजा मांगली येथील शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीमध्ये झालेल्या चुकीच्या मॅपिंगमुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी बुधवारी मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेऊन निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये फार्मर आयडीतील त्रुटींमुळे संबंधित शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. संबंधित शेतकऱ्यांची माहिती योग्य साज्यामध्ये अद्ययावत करून चुकीचे मॅपिंग तातडीने दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षाही आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हिताच्या या महत्त्वाच्या प्रश्नावर लवकरच योग्य कार्यवाही होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments