लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या प्राचार्यांच्या घरावर डल्ला; ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास


अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेलेल्या प्राचार्यांच्या घरावर डल्ला; ९६ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

वरोरा :
वरोरा शहरातील भवानी लेआउट परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे ९६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तक्रारदार मनोहर रामचंद्र चौधरी (वय ६०) हे राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते कुटुंबासह २३ जुलै रोजी अंत्यविधीसाठी चिमूर येथे गेले होते. २५ जुलै रोजी घरी परतल्यानंतर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले तसेच घरातील कपाटे उघडलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरट्यांनी घरातील १५ ग्रॅम सोन्याची साखळी, ६ ग्रॅमची अंगठी, ८ ग्रॅमचे मंगळसूत्र, कानातील टॉप्स, सोन्याचे मणी व जीवती असा एकूण ९६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक महादेव ढोके करीत आहेत.  



Comments