लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात १.१३ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

वरोऱ्यात १.१३ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या व्यवहाराच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

वरोरा, दि. २८ जुलै : वरोरा शहरात मालमत्ता व सोन्याचे दागिने विक्रीच्या आमिषाने तब्बल ₹१ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी विनोद सोयाम व त्यांची पत्नी पायल सोयाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील शिवसागर डेअरीचे व्यावसायिक शिवकुमार रामचंद्रजी गुप्ता (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे त्यांची विनोद सोयाम यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी वरोरा येथील बंगला, तीन प्लॉट, नागपूरमधील मनीषनगर येथील फ्लॅट तसेच सुमारे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने विकायचे असल्याचे सांगून आरोपीने मालमत्तेचे व्यवहार करण्याची तयारी दर्शविली.
त्यानंतर व्हॉट्सअॅप कॉलद्वारे सातत्याने संपर्क साधत आरोपीने तक्रारदाराला वरोरा येथे येण्यास सांगितले. २७ जुलै रोजी तक्रारदार शिवकुमार गुप्ता हे त्यांचे मित्र रामकृष्णकुमार भुत, अब्दुल सबूर अब्दुल सत्तार व अशोक नंदनवार यांच्यासह वरोरा येथे आले. आरोपीने त्यांना आनंदवन चौक परिसरातून आपल्या घरी नेऊन घर, तीन प्लॉट तसेच नागपूरमधील फ्लॅट यांची माहिती दिली. त्यावेळी आरोपीची पत्नी पायल सोयाम हिलाही उपस्थित करून व्यवहार निश्चित करण्यात आला.

एकूण ₹१,१३,५०,००० रुपयांमध्ये सौदा ठरल्यानंतर तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून ₹५६,५०,००० रोख रक्कम आरोपींना दिली. तसेच एचडीएफसी बँकेचे ₹२७ लाख व ₹३० लाख असे एकूण ₹५७ लाखांचे दोन धनादेश (चेक) विनोद सोयाम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
रक्कम स्वीकारल्यानंतर मालमत्तेची कागदपत्रे आणण्याचे सांगून विनोद सोयाम घराच्या आत गेले. मात्र, घराच्या मागील दरवाजातून रोख रक्कम व धनादेश घेऊन पसार झाले. काही वेळाने पायल सोयाम घरी परत आल्या आणि या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.
तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी विनोद सोयाम व पायल सोयाम या दाम्पत्याविरुद्ध भारतीय न्याय सहित बिएन एस2023 नुसार 3(5) ,318 (4) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वेंकय्याजी मित्तरवार करीत आहेत.


Comments