वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण; घरात डांबून ठेवत बहिणीला मारहाण.

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण; घरात डांबून ठेवत बहिणीला मारहाण

चंद्रपूर | प्रतिनिधी | दि. 26 जुलै

चंद्रपूर शहरातील  परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी लोकेश चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी 24 जुलै रोजी नेहमीप्रमाणे सायकलने शाळेसाठी घरातून निघाली होती. मात्र सायंकाळपर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला असता ती आरोपीच्या घरात असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन पाहणी केली असता मुलगी घरात आढळून आली. मुलीने आरोपीने आपल्याला फूस लावून घरात आणून डांबून ठेवल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यावेळी मुलीच्या मोठ्या बहिणीने आरोपीला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून तिच्यावर मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 115(2), 127(2), 137(2), 351(3) व 352 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Comments