लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा दूषित पाणीपुरवठा प्रकरणात विदर्भ मल्टीसर्व्हिसेसवर कारवाईचे संकेत; नगर विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा अहवाल मागवला.


वरोरा दूषित पाणीपुरवठा प्रकरणात विदर्भ मल्टीसर्व्हिसेसवर कारवाईचे संकेत; नगर विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा अहवाल मागवला.

वरोरा 

वरोरा शहरातील दूषित पाणीपुरवठा प्रकरणी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून नगर विकास विभागाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने २४ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात या प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वरोरा-भद्रावतीचे आमदार करण देवतळे यांनी वरोरा शहरातील दूषित पाणीपुरवठा प्रकरण उपस्थित करून संबंधित विदर्भ मल्टीसर्व्हिसेस कंपनीला काळ्या यादीत (Black List) टाकण्याची मागणी केली होती. त्यावर नगर विकास राज्यमंत्र्यांनी "जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा आदेश देता येणार नाही," असे आश्वासन दिले होते.

या आश्वासनाच्या अनुषंगाने नगर विकास विभागाने आता जिल्हाधिकाऱ्यांना प्रकरणाची सविस्तर चौकशी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. विधानमंडळाशी संबंधित बाब असल्याने या प्रकरणाला प्राधान्य देण्यासही पत्रात सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या या निर्देशांमुळे वरोरा दूषित पाणीपुरवठा प्रकरणात पुढील प्रशासकीय कारवाईला वेग येण्याची शक्यता असून संबंधित कंपनीविरोधातील कार्यवाहीकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.



Comments