लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बोगस सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल१७ शेतकऱ्यांची फसवणूक; कंपनीसह संचालकाविरोधात भद्रावती पोलिसांत कारवाई.

बोगस सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
१७ शेतकऱ्यांची फसवणूक; कंपनीसह संचालकाविरोधात भद्रावती पोलिसांत कारवाई.

भद्रावती 25/7/26
भद्रावती : तालुक्यातील १७ शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे व कथित बोगस सोयाबीन बियाणे विकून फसवणूक केल्याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात कंपनी व तिच्या प्रतिनिधीविरोधात विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा २३ जुलै २०२६ रोजी नोंदविण्यात आला.


तक्रारदार प्रफुल्ल शेषराव अडकिने (वय ४५), कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भद्रावती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कांसाशिरपूर, मासळ व रत्नापूर येथील एकूण १७ शेतकऱ्यांनी बूस्टर कंपनीचे 'हुतुतु' जातीचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती. मात्र अपेक्षित प्रमाणात उगवण न झाल्याने शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर कृषी विभागाने शेतपाहणी करून पंचनामे केले तसेच बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.
नागपूर येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित बियाणे अप्रमाणित व सदोष असल्याचे निष्पन्न झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर कंपनीचे संचालक राहुल  पु रमे व बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, बियाणे अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विरेंद्र देविदास केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments