वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वनविभागाच्या संरक्षण कुंपणावरील दोन लोखंडी गेट चोरीला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

वनविभागाच्या संरक्षण कुंपणावरील दोन लोखंडी गेट चोरीला; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा | दि. 24 जुलै 2026|चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील केळी गावाजवळील जंगल परिसरात वनविभागाच्या संरक्षण कुंपणावरील दोन लोखंडी गेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार कुमारी कल्पना शंभू पेंडोर (वय 40) या वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या तक्रारीनुसार केळी गावाजवळील सर्वे क्रमांक 171 मधील 'कॅम्पा' योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या चेनलिंक फेन्सिंगच्या प्रवेशद्वारावरील दोन लोखंडी गेट अज्ञात व्यक्तींनी चोरून नेले. या चोरीमुळे वनविभागाचे सुमारे 22 हजार 680 रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा क्रमांक 0826/2026 दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.



Comments