लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बसस्थानक मार्गावरील डेकोरेटिव्ह पोल पुन्हा कोसळला; निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नागरिकांत संताप.

बसस्थानक मार्गावरील डेकोरेटिव्ह पोल पुन्हा कोसळला; निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नागरिकांत संताप.

वरोरा | प्रतिनिधी
वरोरा शहरातील बसस्थानक मार्गावर सुयोग ट्रेडिंग इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर यांनी उभारलेला आणखी एक डेकोरेटिव्ह पोल पावसामुळे कोसळल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सततच्या पावसात पोल जमिनीवर कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारे पोल कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यासाठी पालिकेतर्फे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. जुने लाईट असून सुद्धा नवीन डेकोरेटिव्ह पद्धतीने लाईट शहरात लावण्यात आले होते. मात्र लाईट रात्री लागण्या ऐवजी ते खाली कोसळून पडत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामांची दर्जेदार अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अशा घटना घडत आहेत. संबंधित विभागाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच बसविण्यात आलेल्या सर्व डेकोरेटिव्ह पोलची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments