लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जगन्नाथ बाबा मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम लंपाससीसीटीव्हीत तिघे संशयित कैद; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल.

जगन्नाथ बाबा मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास
सीसीटीव्हीत तिघे संशयित कैद; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा - चेतन लूतडे 

वरोरा : शहरातील शिवाजी वॉर्ड परिसरातील जगन्नाथ बाबा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील अंदाजे ३ ते ४ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मेघनाथ वासुदेव कुरेकार (वय ६३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २० जुलै रोजी सकाळी मंदिरात पूजा करून दानपेटी सुरक्षित अवस्थेत ठेवण्यात आली होती. मात्र सायंकाळी शेजाऱ्यांकडून फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली असता दानपेटीचे कुलूप फोडून त्यातील रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित युवक दानपेटी फोडून पैसे काढताना दिसून आले आहेत. या आधारावर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार करीत आहेत.

Comments