वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा पोलिसांची अवैध दारूविक्रीवर सलग कारवाई; दोन ठिकाणी छापे, १२२ देशी दारूच्या बाटल्या जप्त

वरोरा पोलिसांची अवैध दारूविक्रीवर सलग कारवाई; दोन ठिकाणी छापे, १२२ देशी दारूच्या बाटल्या जप्त
वरोरा | दि. २१ जुलै २०२६

वरोरा पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई करत खांबाडा व माढेळी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १२२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या कारवाईत खांबाडा येथील आरोपी किसना सुखदेव मानकुमरे (वय २६) याच्या पानटपरीवर छापा टाकण्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून विक्रीसाठी ठेवलेल्या ९० मिलीच्या ६२ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून त्यांची किंमत २,४८० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत माढेळी येथील गजानन कवडूजी वाडाफाडे (वय ४२) याच्या पानटपरीवर छापा टाकून ९० मिलीच्या ६० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत २,४०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
दोन्ही कारवाया गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पंचांसमक्ष केल्या. जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments