लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात किरकोळ वादातून चुलत काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

वरोऱ्यात किरकोळ वादातून चुलत काकाचा पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
वरोरा : प्रतिनिधी

वरोरा शहरातील यात्रा वॉर्ड परिसरात किरकोळ वादातून चुलत काकाने पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना १६ जुलैच्या रात्री घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

जखमी प्रभू नागेश चिंतलवार (वय २८, रा. वडार मोहल्ला, यात्रा वॉर्ड, वरोरा) यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते भंगार गोळा करण्याचे काम करतात. गुरुवारी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास घराबाहेर मित्रांसोबत गप्पा मारत असताना त्यांचे चुलते पोचमल्लू मधुकर दांडेकर तेथे आले. त्यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर आरोपीने स्वतःला "वडार मोहल्ल्याचा डॉन" म्हणत पँटच्या खिशातून लोखंडी चाकू काढला.
यानंतर आरोपीने "आज तुला मारून टाकतो, तुझे तुकडे करून स्मशानात टाकतो," अशी धमकी देत प्रभू चिंतलवार यांच्या पोटावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी ते पळू लागले असता आरोपीने पाठलाग करून त्यांच्या पाठीवरही चाकूने वार केला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाडस करून आरोपीला पकडले. गंभीर जखमी झालेल्या प्रभू चिंतलवार यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमीच्या तक्रारीवरून आरोपी पोचमल्लू मधुकर दांडेकर याच्याविरुद्ध जीवघेणा हल्ला व खुनाच्या प्रयत्नासंदर्भातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वरोरा पोलीस ठाण्यात सुरू असून, पुढील तपास पोउपनि अजिंक्य पवार करीत आहेत.
........
.     पोलिसांनी दुचाकी चोरणार्या टोळीस पकडले.
.   आमदार करण देवताळे यांची बँकेस सदिच्छा भेट.

.    माजी मुख्याध्यापकाची ऑनलाईन फसवणूक 
................

Comments