वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

पावना येथे अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

 पावना येथे अवैध देशी दारू विक्रीवर वरोरा पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

वरोरा | दि. 19 जुलै 2026

वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पावना गावात अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका इसमावर वरोरा पोलिसांनी कारवाई करत त्याच्याकडून देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 चे कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 17 जुलै रोजी सायंकाळी पावना येथे छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान निर्दोष पुरुषोत्तम ढोक (वय 25, रा. पावना, ता. वरोरा) हा अवैधरित्या देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 24 नग (90 मि.ली.) 'रॉकेट संत्रा' देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ₹960 असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर कारवाई पोलीस हवालदार संदीप विठ्ठल मुळे व त्यांच्या पथकाने पंचांसमक्ष केली. जप्त मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नरेश कावडुजी नन्नावरे करीत आहेत.  



Comments

Post a Comment