लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात घरासमोरून २० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

वरोऱ्यात घरासमोरून २० हजारांची दुचाकी चोरी; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा : शहरातील टिळक वॉर्ड परिसरातून घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

फिर्यादी जितेंद्र रामभाऊ आसेकर (वय ३२), रा. श्रीकृपा नगर, गजानन मंदिराजवळ, टिळक वॉर्ड, वरोरा यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. त्यांच्या मामाच्या नावावर असलेली हिरो होंडा पॅशन प्रो (क्रमांक MH-34-AR-8392) ही ग्रे रंगाची दुचाकी घरगुती वापरासाठी होती.

१२ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता त्यांनी दुकान बंद करून दुचाकी घराच्या अंगणात उभी केली. मात्र, १३ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पाहणी केली असता दुचाकी जागेवर नव्हती. परिसरात शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अखेर वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

चोरीस गेलेली दुचाकी जुनी वापरातील असून तिची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे.

याप्रकरणी वरोरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) (वाहन चोरी) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य अनिल पवार करीत आहेत.



Comments