लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कोळसा लोडिंगदरम्यान चालकाचा मृत्यू; नियमाप्रमाणे भरपाईची मागणी

कोळसा लोडिंगदरम्यान चालकाचा मृत्यू; नियमाप्रमाणे भरपाईची मागणी.

वरोरा : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील गूनौर तालुक्यातील पडला गावचा रहिवासी पुष्पेंद्र सिंग (वय 45) यांचा कोळसा लोडिंगदरम्यान झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कार्यरत असलेले पुष्पेंद्र सिंग हे ट्रकमध्ये कोळसा भरला जात असताना अचानक कोळशाचा ढिगारा अंगावर कोसळल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर चालक संघटना एकवटली असून मृताच्या कुटुंबाला कामगार कायद्यानुसार आणि कंपनीच्या नियमांनुसार योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. मृत चालक गेल्या चार वर्षांपासून चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीत कार्यरत होते.

दरम्यान, मृत चालकाचा पीएफ व विमा (इन्शुरन्स) काढण्यात आला होता की नाही, याबाबत विचारणा केली असता कंपनीचे व्यवस्थापक रुपेश उपाध्ये यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिल्याचे चालकांनी सांगितले.

मृत पुष्पेंद्र सिंग यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या कुटुंबाला चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच डब्ल्यूसीएलकडून नियमानुसार नुकसानभरपाई व इतर सर्व कायदेशीर लाभ तातडीने देण्यात यावेत, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांसह चालक संघटनांनी केली आहे.

घटनेनंतर कंपनीचे व्यवस्थापक रुपेश उपाध्ये यांनी घटनास्थळी येऊन चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत मृताच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि नुकसानभरपाईबाबत स्पष्ट निर्णय होत नाही, तोपर्यंत कामगार त्या ठिकाणी होते
 बहुतांश कामगार हे मध्य प्रदेश येथील असल्याने त्यांच्या जीवनमानाचा आणि गरजू पणाचा फायदा महाराष्ट्रातील काही ट्रान्सपोर्ट कंपनी घेत असल्याचे चित्र यावरून दिसून आले. त्यामुळेच चंद्रपूर जिल्ह्यातील ड्रायव्हर्स, लोडर ,ट्रक ड्रायव्हर कंपनीमध्ये घेतल्या जात नाही. कारण ते आपल्या हक्काची मागणी नेहमी करीत असतात. 
कामगार आयुक्तांनी या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.


Comments