लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ३०.८० लाखांचा हायवा व रेती जप्त

वरोऱ्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; ३०.८० लाखांचा हायवा व रेती जप्त

हायवा चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल; वर्धा नदी रेती घाटावरून परवानगीशिवाय रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती.

वरोरा : वरोरा पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ३० लाख ८० हजार रुपयांचा हायवा ट्रक व ८ ब्रास रेती जप्त केली आहे. या प्रकरणी हायवा चालक व वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वर्धा नदी रेती घाटावरून मोहबाळा रोड मार्गे परवानगीशिवाय रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून एमएच-३४ बीजी-८०१० क्रमांकाचा हायवा अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे ८ ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना अथवा पास नसल्याचे निष्पन्न झाले. 

या कारवाईत अंदाजे ३० लाख रुपयांचा हायवा ट्रक आणि ८० हजार रुपयांची रेती, असा एकूण ३० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
या प्रकरणी दीपक कमलाकर आत्राम (रा. दखलनी, ता. भद्रावती) हा हायवा चालक आणि नवाज शेख (रा. वरोरा) या वाहन मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ अंतर्गत वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

                        वृक्षारोपण 

Comments