वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भरधाव कारची गाईंच्या कळपाला जोरदार धडक; एक गाय ठार, तीन गंभीर जखमी – संतप्त ग्रामस्थांनी वाहन अडवून भरपाईची मागणीमांगली बसस्टॉपजवळ नागपूर महामार्गावरील घटना; चालक फरार, दारूचा साठा व अनेक नंबर प्लेट आढळल्याचा ग्रामस्थांचा दावा


भरधाव कारची गाईंच्या कळपाला जोरदार धडक; एक गाय ठार, तीन गंभीर जखमी – संतप्त ग्रामस्थांनी वाहन अडवून भरपाईची मागणी


मांगली बसस्टॉपजवळ नागपूर महामार्गावरील घटना; चालक फरार, दारूचा साठा व अनेक नंबर प्लेट आढळल्याचा ग्रामस्थांचा दावा

वरोरा | प्रतिनिधी

नागपूर–वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील मांगली बसस्टॉपजवळ मंगळवारी (८ जुलै) सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच-०४ एचएन-४२२२ क्रमांकाच्या मारुती कंपनीच्या कारने गाईंच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने एक गाय जागीच मृत्युमुखी पडली, तर तीन गाई गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार नागपूरहून वरोऱ्याकडे येत होती. गाईंचा कळप रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक घटनास्थळावरून फरार झाला.

घटनेनंतर मांगली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. मृत गाईची तसेच जखमी जनावरांची नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी अपघातग्रस्त वाहन अडवून धरले. वाहनातील चालक अथवा मालक घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त कारमध्ये देशी दारूचा साठा होता. तसेच वाहनात तीन ते चार वेगवेगळ्या नंबर प्लेटही आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या मालाची टिपी आहे की नाही हे कळाले नाही.  या प्रकारामुळे वाहनाबाबत संशय निर्माण झाला असून, या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.


घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यासाठी वरोऱ्यातून टोईंग व्हॅनही बोलाविण्यात आली असून वाहन पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू होती.

या प्रकरणी पुढील तपास वरोरा पोलीस करीत असून, फरार चालकाचा शोध घेतला जात आहे. तसेच वाहनातील साहित्य, कागदपत्रे आणि ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यांचीही पडताळणी केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

........


Comments