लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चिचघाट येथे दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांना मारहाण; पोलीस पाटलालाही धक्काबुक्की, तिघांविरुद्ध गुन्हाअवैध दारू विक्रीला विरोध केल्याचा राग; अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी.

चिचघाट येथे दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांना मारहाण; पोलीस पाटलालाही धक्काबुक्की, तिघांविरुद्ध गुन्हा

अवैध दारू विक्रीला विरोध केल्याचा राग; अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी

शेगाव (बु.) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचघाट येथे गावातील दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांनी अवैध दारू विक्री रोखण्याचा प्रयत्न केला असता तिघांनी महिला सदस्यांशी धक्काबुक्की, अश्लील शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी शेगाव (बु.) पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी अंकुश बाबा शिवरकर (पोलीस पाटील, रा. चिचघाट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गावातील महिला मंडळाने दयाराम हिवरकर यांच्या शेताजवळ अवैध दारू पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी गेले. तेथे महिला मंडळाच्या सदस्यांनी दारू जप्त करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पंजाब अंधरेले, अर्जुन अंधरेले व सागर अंधरेले (रा. वाहनगाव) यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या झटापटीत काही महिलांना किरकोळ दुखापत झाली. फिर्यादी पोलीस पाटील मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांनाही धक्काबुक्की करून शर्ट फाडण्यात आला व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आरोपी दारूची पिशवी घेऊन तेथून पसार झाले. 

या प्रकरणी शेगाव (बु.) पोलीस ठाण्यात आरोपी पंजाब अंधरेले, अर्जुन अंधरेले व सागर अंधरेले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2), 132, 296, 3(5) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमित ईश्वर कांबळे करीत आहेत.

Comments