लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अवैध दारू तस्करी पकडली.नंदोरीजवळ कारमधून ५.१५ लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा.

पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अवैध दारू तस्करी पकडली.

नांदोरीजवळ कारमधून ५.१५ लाखांचा अवैध विदेशी मद्यसाठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा.

वरोरा : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदोरी परिसरात धडक कारवाई करत कारमधून सुमारे ₹5,15,858 किमतीचा अवैध विदेशी मद्यसाठा, कार व मोबाईल जप्त केला. या प्रकरणी नरेंद्र जितेंद्र भाट (वय 31), सौ. दामिनी नरेंद्र भाट (वय 28) आणि सूर्या उर्फ सुरज परसंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. �0779 Publish FIR.pdf

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 30 जून रोजी नांदोरी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी संशयित टोयोटा इटिओस (MH-01-BT-1087) कार अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून वाहन थांबविल्यानंतर कारमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा आढळून आला. तपासात 251 बाटल्या GOA Spirit of Smoothness Whisky, 102 बाटल्या Bombay Special Whisky, टोयोटा इटिओस कार तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण ₹5,15,858 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 चे कलम 65(अ), 65(ई) आणि 83 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 



Comments