लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

तुराणा घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून बेपत्ता; शोधमोहीम सुरू

तुराणा घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून बेपत्ता; शोधमोहीम सुरू

वरोरा : रविवारची सुट्टी असल्याने वर्धा नदीवरील तुराणा घाट येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एका तरुणाचा खोल पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव क्षितिज चौधरी असून तो चंद्रपूर येथील रहिवासी आहे असे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, क्षितिज चौधरी आणि त्याचे दोन मित्र हिरो आणि अरुण पोहण्यासाठी गेले होते. क्षितिज व त्याचे मित्र वरोरा येथील जीएमआर कंपनीमध्ये कार्यरत आहेत. रविवारची सुट्टी असल्याने तिघेही वर्धा नदीवरील तुराणा घाट परिसरात दुपारी पोहण्यासाठी गेले होते.
नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी मध्यभागी वाळूच्या पोत्यांचा तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावरून पुढे गेल्यानंतर तिघेही नदीत पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना ते खोल पाण्यात गेल्याने क्षितिज चौधरी याचा अंदाज सुटला आणि तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला. 
घटनेनंतर त्याच्या दोन मित्रांनी तत्काळ जीएमआर कंपनीला तसेच संबंधित यंत्रणेला माहिती दिली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले असून पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.
वृत्त लिहीपर्यंत क्षितिज चौधरी याचा शोध लागलेला नव्हता. पोलीस आणि बचाव पथकाकडून नदीत कसून शोधमोहीम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.



Comments