लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाची कारवाई; देशी दारू सह ३८ हजारांची मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल.

वरोरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाची कारवाई; देशी दारू सह ३८ हजारांची मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल.


वरोरा : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने वरोरा शहरात धाडसी कारवाई करत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत ८ हजार रुपयांची देशी दारू व ३० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली पथक वरोरा परिसरात पेट्रोलिंग व अवैध धंद्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गाणफाडे ले-आऊट रेल्वे पटरीजवळ सापळा रचण्यात आला.
या कारवाईदरम्यान आरोपी खुशाब चक्रपाणी दिवसे (वय ३६, रा. इंदिरा नगर, बोर्डा, ता. वरोरा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील होंडा अॅक्टिव्हा (MH-34-AZ-7630) या दुचाकीची तपासणी केली असता ९० मिलीच्या देशी दारूच्या २०० बाटल्या आढळून आल्या. दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने देशी दारू व दुचाकी असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही देशी दारू विनापरवानगी कोणत्या दुकानातून विकत घेतली आहे याचा तपास  पोलीस करीत आहेत.

Comments