लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वरोरा पोलिसांची कडक भूमिका; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांवर होणार कारवाई

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वरोरा पोलिसांची कडक भूमिका; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांवर होणार कारवाई

वरोरा | प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी शहरातील सर्व ऑटोचालक संघटना व शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोचालकांची तातडीची बैठक घेऊन महत्त्वाच्या सुरक्षा सूचना दिल्या.

बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, एका ऑटोमध्ये सहा विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये. तसेच ऑटोच्या समोरील सीटवर कोणत्याही विद्यार्थ्याला बसवू नये, असे सक्त निर्देश देण्यात आले.

याशिवाय, ऑटोच्या वर लावण्यात येणारा स्टँड सुरक्षित पद्धतीने तयार करावा व त्याच्या बाजूला कोणत्याही विद्यार्थ्याचे दप्तर लटकणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऑटोच्या दोन्ही बाजूंच्या दरवाजांवर संरक्षक जाळी बसविणेही बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी इशारा देताना सांगितले की, ऑटोचालक व पिकप व्हान याना मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधित चालकाचा वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.

तसेच, या सर्व सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटोचालकांवर येत्या काही दिवसांत विशेष तपासणी मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वरोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, सर्व ऑटोचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



Comments