लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*महालगाव (बु) गुरुदेव सेवा मंडळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती भेट**स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम**आमदार करणजी देवतळे यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न*

*महालगाव (बु) गुरुदेव सेवा मंडळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती भेट*

*स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम*

*आमदार करणजी देवतळे यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सोहळा संपन्न*

भद्रावती, प्रतिनिधी :

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ट्रस्टच्या 'विदेही सद्गुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन' अभियानांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगाव (बु.) येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भव्य मूर्ती भेट देण्यात आली.

या मूर्ती प्रदान सोहळ्याचे उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणजी देवतळे व त्यांच्या पत्नी सौ. वेदांती करण देवतळे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.

यावेळी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त रवींद्र शिंदे उपस्थित होते.

ग्रामीण भागात संत विचारांचा प्रसार व्हावा, समाजात प्रबोधनाची चळवळ अधिक बळकट व्हावी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारांचा जनमानसात प्रसार व्हावा, या उद्देशाने ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान श्री गुरुदेव सेवा मंडळ, महालगाव (बु.)चे अध्यक्ष विलास तिखट व मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मूर्ती अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने स्वीकारली.

याप्रसंगी परिसरातील अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात संत परंपरेचे जतन आणि समाजप्रबोधनासाठी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे महालगाव परिसरात सर्वत्र स्वागत होत असून, उपस्थितांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.


Comments