लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावतीत सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांची धाड₹१३,९०५ चा मुद्देमाल जप्त; एकाला अटक, मुख्य पुरवठादार फरार.

भद्रावतीत सुगंधित तंबाखूच्या अवैध कारखान्यावर पोलिसांची धाड
₹१३,९०५ चा मुद्देमाल जप्त; एकाला अटक, मुख्य पुरवठादार फरार.

भद्रावती | प्रतिनिधी | दि. 8 जुलै
भद्रावती पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शास्त्रीनगर परिसरात धाड टाकून सुगंधित तंबाखू व मावा तयार करण्याच्या अवैध व्यवसायावर कारवाई दिनांक पाच जुलैला करण्यात आली. या कारवाईत ₹१३,९०५ किमतीचा सुगंधित तंबाखू, सुपारी, चुना व तयार मावा जप्त करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य पुरवठादार अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर येथे छापा टाकण्यात आला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान प्रशिक हिरामन चहांदे (वय ३०, रा. शास्त्रीनगर, भद्रावती) हा आपल्या घरात सुपारी व सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करताना आढळून आला. घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा साठा आणि मावा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
जप्त मुद्देमाल
३५ सीलबंद "मजा १०८" सुगंधित तंबाखूचे डबे – किंमत ₹९,९७५
अंदाजे १ किलो कातरलेली सुपारी – किंमत ₹५३०
१ किलो चुना – किंमत ₹५००
तयार माव्याच्या ७० पुड्या – किंमत ₹२,८००
मावा तयार करण्यासाठी वापरलेले दोन रबरी तुकडे – किंमत ₹१००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹१३,९०५.
चौकशीदरम्यान आरोपी प्रशिक चहांदे याने हा सुगंधित तंबाखू व सुपारीचा माल वैभव लांडे (रा. बेघर वस्ती, सुमठाणा) याच्याकडून मिळाल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी वैभव लांडे याच्या शोधासाठी पथक पाठविले; मात्र तो घरात न आढळल्याने तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील संबंधित कलमान्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Comments