लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आमदार करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा-भद्रावतीत दिवसभर सामाजिक उपक्रम राबवीनार.

आमदार करण देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा-भद्रावतीत दिवसभर सामाजिक उपक्रम राबवीनार

चेतन लूतडे 7/7/2026.
वरोरा, दि. — ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी  वरोरा व भद्रावती येथे विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर धार्मिक दर्शन, गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वितरण, रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे व बेबी किट वाटप अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.

नवीन भाजप कार्यालयाचे उद्घाटन करताना मान्यवर 

सकाळी ७ वाजता वणोजा गणपती मंदिरात आरती व दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजता वरोरा पोलीस स्टेशनसमोरील गोसंरक्षण संस्थेत जनावरांना चारा व गूळ वाटप करण्यात येईल. सकाळी ८.३० वाजता आनंदवन येथील मूकबधिर विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना भोजन तसेच वॉटर फिल्टर भेट देण्यात येणार आहे.

सकाळी ९ वाजता भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालय, एलआयसी कार्यालयामागे, वरोरा येथे नागरिकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.

त्यानंतर सकाळी ९.३० वाजता गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना तीनचाकी सायकलींचे वितरण करण्यात येईल.
सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे रुग्णांना फळे व नवजात बालकांसाठी बेबी किटचे वितरण आमदार करण देवतळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येईल. सकाळी ११ वाजता आंबेडकर चौक येथे लाडूतुला कार्यक्रम होणार आहे.

यानंतर सकाळी ११.३० वाजता शिवालय कार्यालय, वरोरा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच काही विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे आयोजन स्व. श्रीनिवास शिंदे स्मृती रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनराज आसवले यांनी केले आहे.

सकाळी ११.४५ वाजता नगर परिषद नेहरू विद्यालयात महिला आघाडी, वरोरा शहरच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येईल. तसेच जनसंपर्क कार्यालय, जिनिंग परिसर, वरोरा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला आमदार देवतळे भेट देतील.
दुपारी ३ वाजता मालवीय वार्डातील भारतभूषण मालवीय विद्यालयात नगर परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वितरण करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चा वरोरा शहरचे अनिकेत नकाडे यांनी केले आहे.
सायंकाळी ४.३० वाजता आमदार देवतळे भद्रावतीकडे रवाना होतील. सायंकाळी ५ वाजता गवराळा गणपती मंदिरात आरती, दर्शन व ब्लँकेट वाटप करण्यात येईल. त्यानंतर ५.३० वाजता नागा मंदिराला भेट दिली जाईल.
सायंकाळी ६ वाजता भद्रावती येथे तालुका सुपरव्हिजन खरेदी-विक्री कार्यालयाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ६.३० वाजता युवा मोर्चा भद्रावती शहराच्या वतीने लाडूतुला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ७ वाजता श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे नागरिकांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता भद्रावती नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन गोविंदा बिंजवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
रात्री ८ वाजता श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून दिवसभराच्या वाढदिवस सोहळ्याची सांगता होणार आहे.
आमदार करण संजय देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध सामाजिक उपक्रमांमुळे वरोरा-भद्रावती मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
................................

Comments